मुंबई | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प सादर केला. यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती.
संकटाचं संधीमध्ये रुपांतर कसं करतात हे दाखवणारा आजचा अर्थसंकल्प आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
कोरोनाचा परिणाम न होऊ देता अर्थसंकल्प सादर केला गेला. आरोग्य, आर्थिक आणि पायाभूत सुधारणांस विकास, नाविन्यता आणि विकास अशा सहा सूत्रांवर अर्थसंकल्प सादर केला गेला आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ग्रामीण पायाभूत सेवा क्षेत्रासाठी 40 हजार कोटींची तरतूद करण्यात आली.सर्व क्षेत्रातील सर्व कामगारांना किमान वेतन कायदा लागू करण्यात आला. देशाच्या इतिहासात कामगारांसाठी घेण्यात आलेला क्रांतिकारक निर्णय आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
थोडक्यात बातम्या-
अर्थसंकल्पानं देशातील जनतेला मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलंय- अजित पवार
बजेटमध्ये आत्मनिर्भर भारतचं दर्शन, हा बजेट एक सकारात्मक बदल घडवेल- नरेंद्र मोदी
आत्मनिर्भर भारत म्हणून सादर केलेला अर्थसंकल्प प्रत्यक्षात…- अमोल कोल्हे
‘…असा विचार करणं कितपत योग्य आहे?’; रोहित पवारांची केंद्र सरकारवर टीका
सरकारचा कंपन्यांना दिलासा; पीएफसंदर्भात निर्मला सितारामन यांची मोठी घोषणा