बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राज्य सरकार अधिवेशनापासून दुर पळत आहे’

मुंबई | यंदाचं अधिवेशन हे मुंबईत घेण्यात येणार असून अधिवेशन 5 दिवसांचं असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackrey) यांची प्रकृती बरी नसल्याने अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यावरून भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही राज्य सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय राज्य सरकार अधिवेशनापासून दुर पळत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

ते म्हणाले, राज्य सरकार अधिवेशनापासून दुर पळत आहे. अधिवेशन केवळ 4 ते 5 दिवसाचं घेण्यात येणार आहे. यातील पहिला दिवस केवळ शोक प्रस्तावात जातो, यामुळे यंदाचं अधिवेशन केवळ 4 दिवसाचच असणार आहे. आमची मागणी होती, अधिवेशन वाढविण्यात यावे. मात्र, राज्य सरकारने अधिवेशन वाढविण्यास नकार दिल्याचं फडणवीस म्हणाले.

पुढे फडणवीस म्हणाले, तारांकीत प्रश्नावर गेल्या 2 वर्षात एकदाही उत्तर देण्यात आलं नाही, लक्षवेधीलाही उत्तर देण्यात आलं नाहीये. त्यामुळे सरकारने सगळी आयुधं गोठविण्याचं काम केलं आहे, अशी टीका फडणवीसांनी केली आहे. शिवाय माझ्या मागणीनंतर सरकारने तारांकीत प्रश्नाची उत्तर देण्यास सरकार तयार झाले असल्याचंही त्यांनी सांगितलं.

याशिवाय, यंदाचं अधिवेशन मुंबईत घेण्यात येणार आहे. यावरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘गेल्या 2 वर्षात विदर्भात एकही अधिवेशन झालं नाही. त्यामुळे विदर्भातील नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटला आहे. आता येत्या मार्चमधील अधिवेशन नागपूरला घेण्यात यावं अशी आम्ही विनंती केली आहे,’ असंही ते म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

ठाकरे सरकारचे तीन नवे नेते किरीट सोमय्यांच्या रडारवर; लवकरच करणार खुलासा

पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, तब्बल एवढ्या गावात झालं 100% लसीकरण

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात, ‘या’ वादळी मुद्द्यांवर होणार चर्चा

परमबीर सिंह हाजीर हो! सिंह अखेर चांदीवाल समिती समोर लावणार हजेरी

‘या’ ॲपद्वारे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेत करता येणार शेती मालाची विक्री

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More