“युक्रेनने नाटो ऐवजी आमच्या मुख्यमंत्री ठाकरेंकडेच मदत मागायला हवी होती”
मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. विधानसभेत मांडलेल्या प्रश्नांवर सरकारकडून उत्तर मिळत नसल्याने देवेंद्र फडणवीस आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत अनेक मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचं काम केलं. मात्र, कोणत्याच प्रश्नावर सरकारकडून उत्तर मिळालं नसल्याने फडणवीसांनी तुफान टोलेबाजी केली. युक्रेन (Ukraine) राष्ट्राध्यक्षांनी नाटो ऐवजी आपल्या मुख्यमंत्र्यांकडे मदत मागावी असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला.
सध्या युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू आहे. युक्रेनचे जे अध्यक्ष आहेत झेलेन्स्की हे युद्ध थांबवण्यासाठी नाटो राष्ट्राची मदत मागत आहेत. नाटो ऐवजी त्यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांची मदत मागितली असती तर बरं झालं असतं. कारण मुख्यमंत्र्यांकडे असं एक शस्त्र आहे, असा एक बॉम्ब आहे जो सगळ्यावर भारी आहे. त्याचं नाव आहे टोमणे बॉम्ब, असा घणाघात फडणवीसांनी केला.
दरम्यान, टोमणे सोडून मुख्यमंत्र्यांकडे काहीच नाही, अशी टीका देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज पर पेहरा है, जख्म बहोत गेहरा हैं, लगता हैं बडी चोट़ खायी है, दर्द बनकर बातें जबा़न पर आयी है, अशी यांची अवस्था आहे म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
थोडक्यात बातम्या-
‘मी राज्यात मंत्री असतो तर मुंबईत…’; नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
“ईडी आहे की घरगडी आहे हेच कळत नाही”
“तुम्हाला सत्ताच हवीय ना, मी तुमच्यासोबत येतो, टाका मला तुरुंगात”
शिवसेना नेत्याचे प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप, म्हणाले…
होय आम्ही अपयशी ठरलो!; भर सभागृहात शिवसेनेच्या मंत्र्याची कबुली
Comments are closed.