मुंबई | तीन महिन्यांपासून एसटी कामगारांच्या वेतनात कपात, कामगार कपातीच्या संकटामुळे सातत्याने डोक्यावर टांगती तलवार, भविष्यासाठीची अनिश्चितता यांसारख्या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली.
देवेंद्र फडणवीस यांनी एसटी कर्मचार्यांच्या प्रश्नासंदर्भात उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय सध्या अतिशय अस्थितर मानसिकतेतत जीवन जगत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी पत्रात नमूद केलंय.
3 ते 4 महिन्यांपासून काही महिन्यांचे आंशिक वेतन त्यांना प्राप्त झाले, जूनचे तर वेतनही अजून प्राप्त झालेले नाही. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे 25 टक्के वेतन अजूनही मिळालेले नाही, मे महिन्याचे 50 टक्के वेतन अजून मिळालेले नाही, तर जून महिन्याचे 100 टक्के वेतन अजून मिळालेले नाही. त्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांवर अर्थार्जनासाठी भाजीपाला विकणे, गवंडी काम करण्याची वेळ आली आहे, असं फडणवीसांनी सांगितलय.
एसटी कर्मचाऱ्यांपैकी 328 कर्मचारी कोरोनाबाधित झाले. त्यापैकी 8 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या 8 जणांच्या कुटुंबीयांना अद्यापही मदत मिळालेली नाही. त्या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी फडणवीसांनी केली आहे.
राज्यातील एसटी कर्मचार्यांना तीन महिन्यांपासून वेतनात कपात, कामगार कपातीच्या संकटामुळे सातत्याने डोक्यावर टांगती तलवार, भविष्यासाठीची अनिश्चितता यासारख्या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याबाबत मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांना पत्र @CMOMaharashtra pic.twitter.com/ONrD9oDfsU
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 25, 2020
महत्वाच्या बातम्या-
“राज्यपालांचा फोन आलेला, अर्णब यांच्या नातेवाईकांना भेटू द्या सांगितलं, पण तसं भेटता येणार नाही”
डोनाल्ड ट्रम्प जिंकायला हवे होते, पण आता…- रामदास आठवले
“राज्यपालांनी अर्णब गोस्वामींऐवजी नाईक कुटुंबाची काळजी करावी”
“ठाकरे सरकारविरोधात 302 कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा”
संग्राम देशमुख माझा जावई नाही, मेधाताई काही माझ्या दुश्मन नाही- चंद्रकांत पाटील