“ओबीसी आरक्षणाला ग्रहण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमुळे लागलंय”
मुंबई | राज्यात सध्या ओबीसींच्या मुद्द्यावरुन आरोपांचा कलगितुरा रंगला आहे. विरोधी पक्षाकडून आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेते देेवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर देत नाना पटोले कमालीचे आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. ओबीसी आरक्षणाला ग्रहण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमुळे लागल्याचा आरोप, नाना पटोले यांनी केला आहे.
इम्पिरिकल डेटा दिला जात नाही म्हणून अडचण झाली आहे. मोहन भागवत यांनी आरक्षणाशिवाय भारत पाहिजे अशी अनेकदा घोषणा केली. आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काल मुख्य न्यायमुर्ती यांची भेट घेतली आहे, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.
दरम्यान, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याच्या मुद्यावरुन राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले पहायला मिळाले.
महत्त्वाच्या बातम्या –
जेवण महागणार! गॅस तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी महागला
‘महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींच्या…’; फडणवीसांचा गंभीर आरोप
“राज्यात भोंग्याचं नाही तर भोंगळं राजकारण सुरू आहे”
“बाळासाहेबांची शिकवण आणि पवार साहेबांची सोबत, इकडची दुनिया तिकडे करू”
“उद्धव ठाकरे तुम्ही सुखाने नांदा, पण होऊ देऊ नका तुमचा वांदा”
Comments are closed.