“देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य मोदींना देखील मान्य नसेल, 1993च्या दंगलीत…”
जळगाव | राज्यात गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे विरूद्ध देवेंद्र फडणवीस असा संघर्ष पहायला मिळत आहे. 40 वर्षे भाजपात घालवूनही काही उपयोग झाला नाही, अशी खंत एकनाथ खडसे व्यक्त करत असतात. त्यातच आता देवेंद्र फडणवीस यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत शिवसेनेवर टीका केली होती. त्यावरून एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.
हिंदुत्वाचे प्रखर विचार मांडणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या लेखणीतून आणि वाणीतून समाज जागृत करण्याचे काम केलं,असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने अत्यंत वेदना झाल्या, असंही एकनाथ खडसे म्हणाले आहेत. 1993 साली मुंबईत उसळलेली दंगल आणि इतर घटनांच्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी धारिष्ठ दाखवले होते.
बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतिकार करण्याची भूमिका घेतली होती. त्यावेळी बहुतांश राष्ट्रीय संघटना घाबरल्या होत्या. कोणत्याही पक्षाची रस्त्यावर उतरून प्रतिकार करण्याची क्षमता नव्हती. अशावेळी बाळासाहेबांनी प्रतिकार केला. एमआयएम पक्षाशी शिवसेनेची युती नसताना देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ प्रतिक्रिया देणं चुकीचं आहे, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शिवसेनेने एमआयएमशी युती जरी केली असती तरीदेखील अशाप्रकारे टीका करणे योग्य नाही. देवेंद्र फडणवीस मला वडीलधारे मानत असतील तर सल्ला देऊन उपयोग आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस सातत्याने करत असलेले वक्तव्ये हे नैराश्यातून आलेलं आहे, असा टोलाही एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.
थोडक्यात बातम्या-
महागाईचा पुन्हा भडका उडाला! मार्च महिन्यात दूध, मॅगीसह ‘या’ गोष्टी महागल्या
“… आणि तोपर्यंत देवेंद्र फडणवीसांचा थयथयाट असाच सुरू राहिल”
मोठी बातमी! हिरानंदानी ग्रुपवर आयकर विभागाचा छापा
“ज्यांचा आदर्श दाऊद आहे त्या मटण करींना छत्रपतींबद्दल बोलण्याचा अधिकारच नाही”
महागाईचा भडका, पेट्रोल-डिझेल पाठोपाठ घरगुती गॅस सिलेंडर महागलं
Comments are closed.