बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ओबीसी आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस यांची ‘युज अँड थ्रो’ची भूमिका – एकनाथ खडसे

मुंबई | ओबीसींचं राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर समाज रस्त्यावर उतरून तीव्र रोष व्यक्त करत आहे. तर भाजपनेही आक्रमक पवित्रा घेत, राज्यभर आज चक्काजाम आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनानंतर देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर टीकेचंं सत्र चालूच ठेवलं आहे. त्यात आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देेवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

1990 मध्ये मंडळ आयोगाने ओबीसींना आरक्षण दिलं होतं. त्यावेळीही भाजपने मंडळ आयोगाला विरोध केला होता. त्यामुळे तेव्हापासून भारतीय जनता पक्षाची ओबीसींना आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट आहे. आता देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. राज्य सरकारने काय केलं आणि राज्य सरकारचीच जबाबदारी होती. तर मग तुम्ही पाच वर्ष सत्तेत होते मग तुम्ही का नाही केले?, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

फडणवीस सरकारच्या काळात तुम्ही केंद्राकडे डाटा मागितला होता. तुम्हाला केंद्र सरकार डाटा देत नाही आणि तुम्ही म्हणता राज्य सरकारने केले पाहिजे, हा सर्व प्रकार खोटारडेपणाच आहे. या सर्व प्रकाराला फडणवीसच जबाबदार असून तुम्ही ओबीसी समाजाची दिशाभूल करीत आहात, असा आरोप देखील एकनाथ खडसे यांनी केला आहे.

दरम्यान, मागील सरकारच्या काळातच मोदी यांनी डाटा दिला असता. तर कदाचित देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही ओबीसींना आरक्षण मिळू शकले असते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे कारवाई झाली असती तर आजही परिस्थिती निर्माण झाली नसती. ओबीसींचा उपयोग करून घ्यायचा आणि त्यांना फेकून द्यायचे, अशी युज अँड थ्रो ची भूमिका देवेंद्र फडणवीस यांची आहे, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘फडणवीस RSSच्या शिकवणीप्रमाणे आरक्षण संपवायला निघालेत’; काँग्रेसचा हल्लाबोल

इस्रायली तंत्रज्ञानाद्वारे मुंबईच्या समुद्रातील 200 दशलक्ष लिटर खारं पाणी होणार पिण्यायोग्य

प्रदीप शर्माची तळोजा कारागृहात रवानगी, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

“तुमची घरं वसुलीवर चालतात, पण सामान्य जनतेला नोकरी, उद्योगधंदे करून घर चालवावं लागतं”

मराठमोळ्या राहीनं पटकावलं गोल्ड मेडल; देशाला पहिलं सुवर्णपदक

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More