माझ्या बायकोला टार्गेट करण्यासाठी काही राजकीय लोकांनी टीम तयार केल्यात- मुख्यमंत्री

मुंबई | काही राजकीय पक्षांनी तर टीम तयार केल्या आहेत की मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला कसे टार्गेट करता येईल, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

भाजप सरकारला 4 वर्षे पुर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने साम टिव्हीने त्यांची मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी हा आरोप केला.

मला असे वाटते की या स्तराला जाऊन जे लोक काम करीत आहेत, ते लोकांना आवडणार नाही. निश्‍चितपणे लोक यांच्या विरोधात जातील. मला असे वाटते की, तिचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे.

दरम्यान, जे योग्य आहे ते तिने केले पाहिजे. अयोग्य असेल तर मी तिला सांगेन की, तुझे अयोग्य आहे. त्यासंदर्भात काय अंतिम  निर्णय करायचाय तो तिला करायचा आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-काय दिवस आलेत?; युवराज आणि हरभजनला पंजाबच्या संघातूनही वगळलं

-काँग्रेस- शिवसेनेच्या आमदारांमध्ये जोरदार धक्काबुक्की!

-दिवाळीआधीच रोहित-रायुडूची आतषबाजी; वेस्ट इंडिजपुढे 378 धावांचं आव्हान

-हिंमत असेल तर राम मंदिराचा अध्यादेश आणून दाखवाच- असदुद्दीन ओवेसी

-रोहितची शतकी खेळी; तर रायुडूचंही अर्धशतक

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या