अमृताने सेल्फीसाठी परवानगी घेतली होती; मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

अमृताने सेल्फीसाठी परवानगी घेतली होती; मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सेल्फी वादावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अमृताने सेल्फी काढण्यासाठी परवानगी घेतली होती, असं मुख्यमंत्र्यांनं सांगितलं आहे.

जेथे त्यांनी सेल्फी घेतला, ती जागा धोकादायक नव्हती. तसेच सेल्फी घेण्यापूर्वी त्यांनी क्रूझच्या कॅप्टनची परवानगी घेतली होती, असं ते म्हणाले.

महाराष्ट्राने या अगोदर तरुण मुख्यमंत्री बघितलेले नाहीत, त्यामुळे हा विषय जास्त चघळला गेला’, असं स्पष्टीकरण त्यांनी दिले. 

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी क्रुझच्या एका टोकाला बसून सेल्फी घेतला होता. त्यामुळे त्यांच्या या सेल्फीवर सोशल मीडियावरून जोरदार टीका करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘टीव्ही’वरील लाईव्ह चर्चेत भाजप आणि काँग्रेस नेते एकमेंकाना भिडले, पाहा व्हीडिओ

-मुख्यमंत्र्यांनी ज्या योजनेमुळे पाठ थोपटून घेतली ती योजना फसली आहे- धनंजय मुंडे

-मुख्यमंत्री आणि गडकरींना शिव्या देणारा पोलिस कर्मचारी निलंबित!

-जलसंधारण मंत्री राम शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर; शेतकऱ्यांसोबत केली न्याहारी

-#MeToo | आणखी एका अभिनेत्रीचा लैगिंक शोषणाचा आरोप

Google+ Linkedin