बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर केला ‘हा’ गंभीर आरोप

कोल्हापूर | माजी खासदार प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सत्तेचा गैरवापर करत सतेज पाटील यांनी महापालिकेचा 15 कोटींचा घरफाळा बुडवल्याचा आरोप महाडिक यांनी केला आहे.

पालकमंत्री सतेज पाटील हे हॉटेल सयाजीचे मालक आहेत. त्यांनी या हॉटेलमधील अनेक गाळे भाड्याने दिले आहेत. भाड्याने दिलेल्या मिळकतींना जादा घरफाळा असतो. तो बुडवण्यासाठी त्यांनी हे गाळे आपणच वापरत असल्याचं सांगत 15 कोटींचा घरफाळा दिला नाही. याबाबत प्रशासनाला अनेकदा कळवूनही प्रशासन काहीच कारवाई करत नाही, असं धनंजय महाडिक म्हणालेत.

महापालिकेवर पालकमंत्री पाटील यांची सत्ता आहे. त्यामुळे अधिकारी त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. तसेच येत्या आठ दिवसात दंड व्याजासहित संपूर्ण रकमेची वसुली केली नाही तर महापालिकेसमोर उपोषण करणार आहे, असा इशारा महाडिक यांनी दिला.

जोपर्यंत कोल्हापूर महापालिका प्रशासन पालकमंत्री पाटील यांच्याकडून 15 कोटी रुपयांची घरफाळयाची वसुली करत नाही, तोपर्यंत जनतेने घरफाळा भरू नये, असं आवाहन धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरकरांना केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

…अन् अशाप्रकारे कुख्यात गुंड गजा मारणे पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे काळाच्या पडद्याआड; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा…

पाकिस्तानात हिंदू कुटुंबावर जीवघेणा हल्ला, 5 जणांचा जागीच मृत्यू

“आमदारकीसाठी नव्हे तर शेतकऱ्याला योग्य दाम मिळावा म्हणून आंदोलन”

‘देवदूतच ठरला यमदूत’! पैसे नसल्याने डॉक्टरांनी चिमुरडीचं शिवलं नाही पोट अन्…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More