दुष्काळग्रस्तांना मदत करण्याबाबत राज्य आणि केंद्र सरकार गंभीर नाही- धनंजय मुंडे

मुंबई | दुष्काळग्रस्तांना मदत करण्याबाबत राज्य आणि केंद्र सरकार गंभीर नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. त्यांनी याबाबत ट्विटरवरुन व्हीडिओ शेअर केला आहे.  

गावागावांत रात्रीच्या वेळी केवळ 2 मिनिटांत दुष्काळाची पाहणी केली जात आहे. केंद्रीय पथकाचे दुष्काळी पाहणी दौरे म्हणजे जनतेच्या जखमांवर मीठ चोळणं आहे, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. 

दुष्काळ पाहणी पथक अधिवेशनाच्या काळातच महारष्ट्रात यायला पाहिजे होतं, असं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, “चारा नसेल तर जनावरं पाहुण्यांकडे किंवा शेजारी पाठवा” मंत्री राम शिंदे यांचं हे वक्तव्य शेतकरी विरोधी आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भाजप सरकार संविधानविरोधी आहे- शरद पवार

-राज ठाकरे माझी कॉपी करत आहेत- प्रकाश आंबेडकर

-‘साताऱ्यात फक्त उदयनराजेच चालतात’; उदयनराजेंच्या समर्थकांची तोडफोड

-मला असली घाणेरडी गोष्ट करायची नाही; राखी सावंतनं लग्न मोडलं!

-‘जीवनातून बाहेर पडण्यासाठी इथं कापा’ असं लिहून विद्यार्थीनीची आत्महत्या