मुंबई | बाजार समित्यांची कार्यपद्धती आणि कामकाज शेतकऱ्यांच्या शेतीमालाकरिता वाजवी दर देण्यात असमर्थ ठरत आहे. त्यामुळे या बाजार समित्या बरखास्त करण्याबाबत सर्व राज्य सरकारांसोबत आम्ही बोलत आहोत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं होतं. यावरच राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी बाजार समित्या बरखास्त करणारं जुलमी सरकार नकोच असं म्हणत भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.
सध्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासाठी वाजवी दर मिळविण्यासाठी बाजार समित्या जास्त उपयुक्त ठरत नाहीये. त्यामुळे ऑनलाइन लिलावाद्वारे व्यवहार करण्यासाठी केंद्राने राष्ट्रीय कृषी बाजाराची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. त्यामुळे बाजार समित्या बरखास्त करण्याबाबत आम्ही विचार करत आहोत, असं सीतारामन यांनी म्हटलं होतं.
निर्मला सीतारामण यांच्या या निर्णयाच्या विरोधात विरोधी पक्ष आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांनी याविषयीचा संताप व्यक्त केला आहे.
बाजार समित्या बरखास्त करणार असल्याचे वक्तव्य सीतारामन यांनी केलं आहे. हा शेतकऱ्यांच्या गळ्यात फास घालून आवळण्याचा प्रकार आहे. आधीच शेतकरी कर्जमाफी, कमी हमीभाव, पिकांची नासाडी अशा संकटांनी त्रासून गेलाय. त्यात सरकार असले निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यापेक्षा हे सरकारच नको, असं मुंडे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
महाशिवआघाडीचंच सरकार येणार???; राष्ट्रवादीनं उचललंय हे महत्वाचं पाऊल https://t.co/yUB86Pbyhv @NCPspeaks
— थोडक्यात (@thodkyaat) November 13, 2019
तुम्ही वेळ वाढवून मागितला होता ना… आता 6 महिने घ्या- रावसाहेब दानवे https://t.co/NmwKVuVDBn @raosahebdanve
— थोडक्यात (@thodkyaat) November 13, 2019
महाशिवआघाडी होऊ नये यासाठी भाजप प्रयत्न करतंय- पृथ्वीराज चव्हाण https://t.co/VuRG1YYzsv @prithvrj @BJP4Maharashtra @ShivSena
— थोडक्यात (@thodkyaat) November 13, 2019