“गडकरी साहेब… जातीवरून राजकारण न करण्याचे सल्ले आपल्या पक्षाला द्या”

मुंबई |  नितीन गडकरी साहेब जातीवर राजकारण न करण्याचे सल्ले आपल्या पक्षाला द्या, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी गडकरींवर केली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस जातीपातीचे राजकारण करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल सोलापुरच्या सभेत केला. याच वक्तव्याचा धनंजय मुंडेंनी समाचार घेतला आहे.

आज अकलूजच्या सभेत पंतप्रधान मोदींनी माझ्या जातीचा उल्लेख विरोधक करत आहेत. जात काढून मत मागण्याची वेळ पंतप्रधान मोदींवर आली आहे. तेव्हा त्यांना अगोदर सल्ला द्या, असं प्रत्युत्तर मुंडेंनी गडकरींना दिलं आहे.

दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातली निवडणूक काही तासांवर येऊन ठेपली आहे. अशातच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी वेगात झडताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-पिंपरी ते शिवाजीनगर मेट्रो यावर्षी धावणारच : गिरीष बापट

सुजयला आपल्याला ‘वॉटरमॅन’ म्हणून ओळख द्यायची आहे- देवेंद्र फडणवीस

…तेव्हापासून विनोद तावडेंच्या डोक्यावर परिणाम झालाय; मनसेची तावडेंवर जहरी टीका

युतीच्या सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले; सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र

-माढ्यातील लोकांना ‘मजबूत’ हिंदुस्थान पाहिजे की ‘मजबूर’- नरेंद्र मोदी