बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धवजी आम्हा शेतकऱ्यांना इतकंही भोळं समजू नका…”

मुंबई |  शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रमक झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे.

उद्धवजी आम्हा शेतकऱ्यांना इतकही भोळं समजू नका… असं म्हणत पीक विमा कंपन्यांची कार्यालयं गेली 5 वर्षे मुंबईत आहेत, हे 5 वर्षांनी तुम्हाला कळलं काय?, असा सवाल त्यांनी उद्धव यांना विचारला आहे.

गेल्या 5 वर्षांपासून पिकविमा कंपन्यांचे कार्यालये मुंबईत आहेत, तेव्हापासून शेतकऱ्यांची या कंपन्या फसवणूक, लूट करत आहेत शिवसेनेला मात्र निवडणुकीच्या तोंडावरच कार्यालये बंद करण्याचे सुचते का?, असंही धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

दरम्यान, भाजप शिवसेनेचे सरकार शेतकरी विरोधी आहे. त्यांना आता हटवलंच पाहिजे, असा निर्धार त्यांनी यावेळी केला.

महत्वाच्या बातम्या

-पुढचा मुख्यमंत्री काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा आघाडीचाच; धनंजय मुंडेंचा विश्वास

-…तेव्हा मंत्रिपदाबाबत माझा नक्की विचार होईल- एकनाथ खडसे

-मोहम्मद शमीची हॅट्रीक मात्र प्लॅन मास्टरमाइंड धोनीचा!

-“भाजपने पळवापळवी करुन जे आमचे नेते पळवले हा सरळ सरळ भ्रष्टाचार”

-पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते आम्हाला धमक्या देतात; काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More