पुणे महाराष्ट्र

…हा तर गोपीनाथ मुंडे यांचा अपमान आहे; धनंजय मुंडे यांचा हल्लाबोल

अहमदनगर | राज्य सरकार औरंगाबादमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला जागा देणार होतं, ती स्मारकाची जागा कुठं आहे, स्मारक कुठं आहे? हा गोपीनाथ मुंडे यांचा अपमान आहे, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे. ते कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत बोलत होते.

राज्य सरकारनं गोपीनाथ मुंडे यांच्या नावानं ऊस मजूरांचे महामंडळ काढण्याचं जाहीर केलं होतं, ते त्यांनीचं रद्द केलं, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेतील हॅकरनं गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाल्याचा दावा केला मात्र त्यांचा वारसा चालवणाऱ्या कोणीही चौकशीची मागणी केली नाही पण आम्ही मात्र तो अपघात होता की घात होता हे सिद्ध झाल्याशिवाय शांत बसणार नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

दरम्यान, 2017-18 मध्ये बेरोजगारीचा दर वाढल्यावरून मोदीजी तुमच्या नोटबंदीनं काय साध्य केलं?, असा सवाल धनंजय मुंडे यांनी विचारला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

राजू शेट्टी चौथ्या आघाडीची मोट बांधण्याच्या तयारीत!

कांद्याच्या भावासाठी आता शिवसैनिक-शेतकरी रस्त्यावर; महामार्ग रोखून धरला…

-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून ‘यांची’ नावं सर्वाधिक चर्चेत! 

युती व्हावी म्हणून गिरीश महाजनांची निवृत्ती महाराजांच्या चरणी प्रार्थना

-अजित पवारांनी सांगितली 12 कोटींच्या रेड्याची गोष्ट, उपस्थितांमध्ये एकच हशा…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या