बेळगावात धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल

बेळगावात धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल

बेळगाव |महामेळाव्यासाठी परवानगी मागूनही न देणाऱ्या कर्नाटक पोलीस प्रशासनाने रंग दाखवला आहे. महामेळाव्याला परवानगी नसताना तो मेळावा घेतला असे कारण देत धनंजय मुंडेंवर बेळगावात गुन्हा दाखल झाला आहे.

धनंजय मुंडेंसह शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे, महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यासह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीमावासीयांना मराठी लोकांच्या लढ्याला बळ देण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेनी काल बेळगावात जाऊन मेळावा घेतला होता. 

दरम्यान, त्यांच्यावर हिवाळी अधिवेशन सुरु असताना संबंधित जागेच्या मालकाकडून, तसेच पोलीस खात्याकडून परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी स्टेज उभारणे व अतिक्रमण करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

-ओवैसींनी वादग्रस्त MIM नगरसेवक सय्यद मतीनला पक्षातून हाकललं!

हे राहुलच्या मेहनतीचं फळ- सोनिया गांधी

-जनता मग्रुरी सहन करणार नाही; शरद पवारांची भाजपवर टीका

-राम मंदिर सोडा आणि विकासाची कास धरा; खासदार संजय काकडेंचा मोदींना सल्ला

-मुख्यमंत्री वसुंधरा राजे स्वतः सावरल्या; मात्र भाजपची नौका बुडवली!

Google+ Linkedin