नागपूर | दुग्धविकास मंत्र्यांना फोन केला म्हणून पोलिसांनी शेतकऱ्याच्या वृद्ध बापाला उचलून नेलं, असा धक्कादायक आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. ते विधान परिषदेत बोलत होते.
अहमदनगरच्या एका शेतकऱ्यानं दुग्धविकास मंत्र्यांना फोन केला होता. दुधाला भाव केव्हा आणि कसा मिळेल?, असा त्यांचा प्रश्न होता. त्यांचं काय बोलणं झालं हे मंत्रिमहोदयांना माहीत असेल. मात्र दुधाचा भाव विचारला म्हणून शेतकऱ्याच्या 55 वर्षीय बापाला पोलिसांनी रात्रीच उचलून नेलं. हे सरकारला शोभणारं आहे का?, असा सवाल धनंजय मुंडे यांनी विचारला.
दरम्यान, आमचं चुकलं तर आम्हाला 50 फोन शिव्या शाप देणारे येतात. तुम्ही तर सत्तेवर आहात. तुम्हाला फोन येणारच, असंही ते म्हणाले.
पाहा व्हीडिओ-
महत्त्वाच्या बातम्या–
-बाळासाहेबांचं स्मारक एका क्षणात का होऊ शकत नाही?- निलेश राणे
-राजू शेट्टी प्रसिद्धीसाठी आंदोलन करत आहेत- रामदास आठवले
-मनसेनं कार्यालय फो़डलं पण शिवराय आणि गणपती बाप्पाचा मान राखला!
-संभाजी भिडेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे- रामदास आठवले
-त्या 16 धनगर मुलांसोबत काय झालं?; अजित पवार यांची धक्कादायक माहिती