मुंबई | राष्ट्रवादीचे नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे. राजे जाऊ द्या… सरदार जाऊ द्या…; राष्ट्रवादी जनतेच्या जीवावर तरेल, असं ते म्हणाले आहेत.
नेत्यांना ईडी आणि सीबीआयची भिती दाखवली जात आहे. भाजपने अत्यंत खालच्या पातळीवरचं राजकारण चालू केलं आहे, असा घणाघात त्यांनी केला आहे.
नेता पक्ष सोडतोय. पण कार्यकर्ता हा पक्षाबरोबर आहे. प्रत्येक नेत्याला वाटतं की त्यांनी पक्ष सोडला म्हणजे जनता त्यांच्याबरोबर जाईल. पण असं होत नाही, असंही ते म्हणाले.
दरम्यान, आज रात्री 8 वाजता उदयनराजे लोकसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा सादर करतील आणि उद्या पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत ते भाजपत प्रवेश करतील.
महत्वाच्या बातम्या-
दारुच्या बाटल्यांचा हार घालून मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार- तृप्ती देसाई – https://t.co/gPmlBdzMaa @trolldesai @Dev_Fadnavis
— थोडक्यात (@thodkyaat) September 13, 2019
उदयनराजेंनी धनंजय मुडेंचं ‘ते’ विधान खोटं ठरवलं!https://t.co/hjCNeEyiiE @Chh_Udayanraje @dhananjay_munde
— थोडक्यात (@thodkyaat) September 13, 2019
बीसीसीआयच्या वाढीसाठी अरुण जेटलींच योगदान मोठ- अमित शहा – https://t.co/neTidCaujT @BCCI
— थोडक्यात (@thodkyaat) September 13, 2019