बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आपण फक्त टगे पोसतोय, हे त्यांना समजलं पाहिजे’; प्रीतम मुंडेंचा घणाघात

बीड | बीड जिल्ह्यातील राजकारण काका पुतन्या, भाऊ-बहीण यांन भोवती फिरताना दिसत असतं. जिल्ह्यातील विकास कामांच्या मुद्द्यांवर मुंडे बहीण-भाऊ हे आता आमनेसामने आले आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पाठोपाठ खासदार प्रीतम मुंडेंनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. जिल्ह्यात फिरत असताना रस्ते कोणी केले हे पालकमंत्र्यांनी पाहिलं पाहिजे, असं प्रीतम मुंडे म्हणाल्या आहेत.

पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात फिरताना रस्ते कोणी केले आहेत हे पाहिलं पाहिजे. आपण फक्त टगे पोसत आहात हेही त्यांना समजलं पाहिजे. तसेच केंद्र सरकारकडून जिल्ह्यासाठी मी काय आणलं पहायचं असेल तर परळी नगरपालिकेच्या बाहेर पडून बघा, अशी जहरी टीका प्रीतम मुंडेंनी धनंजय मुुंडेंवर केली आहे.

यावर्षी दसरा मेळावा हा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. मागील वर्षी कोरोनामुळं दसरा मेळावा पार पडू शकला नाही. येत्या दसरा मेळावा कष्टकऱ्यांचा तसेच भगवानबाबांच्या अनुयायांचा आहे. मागील वर्षी गुन्हे दाखल झाले होते. बीड जिल्ह्यातील राजकारण खालच्या पातळीवर सुरू आहे. आमच्या मेेळाव्यानंतर पालकमंत्र्यांचे अनेक कार्यक्रम पार पडले पण कधी केक कापले तर कधी जेसीबीने फुलांची उधळली तरी त्यांच्यावर कारवाई झाली नाही, असं देखील प्रीतम मुंडे बोलताना म्हणाल्या आहेत.

दरम्यान, बीडमध्ये शुक्रवारी भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यासाठी मोठी जय्यत तयारी सुरू आहे. या मेळाव्यामध्ये मुंडे भगिनी काय बोलतात याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या –

आमदारांची दिवाळी गोड! ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

दिवाळीनिमित्त BSNLची खास ऑफर! ‘या’ महिन्यात मिळेल फुकट डेटा-काॅलिंग

मंदाकिनी खडसेंना तुर्तास तरी अटक नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

“दसरा मेळावा हा कोणत्याही जातीपातीचा तसेच कोणत्याही वर्गाचा नाही”

नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर NCB ‘या’ कारणामुळे न्यायालयात जाणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More