बीड | काहीजण फक्त पराभवाच्या वर्षपूर्तीसाठी बीड जिल्ह्यात येऊन गेले, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना लगावला.
कोरोनाच्या संकटामुळे आम्ही जनतेच्या सेवेत कमी पडलो, असं तुम्हाला जाणवलं का? काहीजणं पराभवाचं वर्ष साजरं करायलाच जिल्ह्यामध्ये येतात. वर्षभर या मातीतील माणसाची कोणालाही आठवण नसते, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधलाय.
अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्याच्यानिमित्ताने पंकजा मुंडे तब्बल आठ महिन्यानंतर बीड जिल्ह्यात आल्या. यावरून धनंजय मुंडे यांनी बीडमधील एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांच्यावर टीका केलीये.
दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट कधी येईल, हे माहिती नाही. त्यामुळे आजही आपल्याला आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
‘कुणीही कितीही टरटर केली तरी…’; नवाब मलिकांचा भाजपला टोला
“ना जीडीपी कळतो, ना अर्थव्यवस्था, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बुद्धू मुख्यमंत्री बसलाय”
कोरोना चाचणी झाली आणखी स्वस्त! आरोग्यमंत्र्यांनी निश्चित केले नवे दर, जाणून घ्या!
संजय राऊत म्हणजे विदूषक, कोणत्या धुंदीत आहात?- नारायण राणे
बाळासाहेब ठाकरेंकडे पाहून गप्प बसलोय, आमच्याकडे नजर फिरवू नका नाहीतर…- नारायण राणे
Comments are closed.