Loading...

“सरकार झोपलेलं… मात्र बीड जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी बारामती धावली”

बीड | संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. पाण्याचं दुर्भिक्ष्य मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. बीड जिल्ह्याची तहान राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी भागवली मात्र सरकार झोपलं आहे. त्यांना जागच आली नाही मात्र अशा परिस्थितीत बारामती धावली, असं ट्वीट विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

10 लाख लिटर क्षमतेचे हे टँकर जिल्ह्यातील 100 गावात पाण्याचा पुरवठा करतील. आणखी 9 टँकर लवकरच दाखल होणार आहेत. रोहित पवार यांच्या हस्ते आज बीड जिल्ह्यात पाण्याच्या टँकरचे लोकार्पण झाले, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

Loading...

पवार साहेबांच्या शब्दानुसार 40 हजार लिटर क्षमतेच्या 21 पाण्याचे टँकर अ‌ॅग्रीकल्चर ट्रस्ट मार्फत बीडमध्ये दाखल झाले आहेत. मी पवार साहेबांचे जिल्ह्यातील जनतेच्या वतीने आभार मानतो, असं यावेळी धनंजय मुंडे यांनी म्हटलं.

Loading...

दरम्यान, राष्ट्रवादीच्या वतीने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करणे चालू आहे, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

-शपथविधीदिनी वाजपेयींच्या आठवणीत मोदींची भावूक प्रतिक्रिया; म्हणतात…

Loading...

-‘मनसे’ची आगामी भूमिका काय असणार?? संदिप देशपांडेंच्या ट्वीटने राजकीय वर्तुळात एकच चर्चा

-‘या’ राज्यात काँग्रेसच्या तब्बल 12 आमदारांनी सोपवले पक्षाकडे राजीनामे

-मुंबईत दोन ठाकरेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण

-मोदींच्या नव्या मंत्रिमंडळासाठी ‘ही’ नावं चर्चेत!

Loading...