यांच्याशिवाय ‘बेस्ट कपल’ कुठलं? ‘व्हॅलेंटाईन डे’ दिनी धनंजय मुंडेंचा सेना-भाजपवर प्रहार

मुंबई |  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे आपल्या आक्रमक भाषणासाठी जेवढे प्रसिद्द आहेत तेवढेच ते मिश्किल आणि बोचऱ्या आशयाची ट्वीट करण्यात सुद्धा तितकेच प्रसिद्ध आहेत…!

धनंजय मुंडेंनी आज ‘व्हॅलेंटाईन डे’चं औचित्य साधत सेना-भाजपवर कोटी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो ट्वीट करत ‘यांच्या’ शिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का?, अशा मिश्किल आशयाचं त्यांनी ट्वीट केलं आहे.

गेली पाच वर्षे रोज कितीही भांडले तरी पुन्हा एकत्रच… केवढा तो एकमेकांवर जीव… नाही का?, असंही त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, त्यांचं हे खरं प्रेम असून त्यांना ‘व्हॅलेंटाईन डे’च्या शुभेच्छा असं देखील धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.

वाचा धनंजय मुंडेंचं ट्वीट-

महत्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्र्यांमुळे मराठा समाजाला न्याय, शिवसेना आमदाराची फडणवीसांवर स्तुतीसुमनं

राष्ट्रवादीसोबत ‘मनसे’ नातं जुळणार का?, एकीकडे राष्ट्रवादीची तर दुसरीकडे मनसेची बैठक!

नको नको म्हणता म्हणता शिवसेना युतीच्या जाळ्यात; हा असणार फॉर्म्युला?

-महाआघाडीचे पंतप्रधान कोण असतील? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली ‘ही’ नावं…

आज राष्ट्रवादी आपले सगळे पत्ते उघडे करणार?, मुंबईत बोलावली महत्वाची बैठक

Google+ Linkedin