धर्मा पाटलांची मृत्यूशी झुंज सुरु, सरकारकडून 15 लाखांची घोषणा

मुंबई | मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांना 15 लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आलीय. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केलीय. 

औष्णिक वीज प्रकल्पासाठी धर्मा पाटील यांची धुळ्यातील 5 एकर शेती संपादित करण्यात आली होती. मात्र त्याबदल्यात त्यांना फक्त 4 लाख रुपयांचा मोबदला देण्यात आला होता. मंत्रालयाचे उंबरे झिजवूनही न्याय मिळत नसल्यानं अखेर त्यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, एकीकडे हक्काची रक्कम मिळाली असली तरी हा शेतकरी मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.