मुंबई | बाॅलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा तिच्या पुनर्विवाहमुळे प्रचंड चर्चेत आलेली आहे. अशातच दियाने मालदिवहून फोटो पोस्ट करून आपण गरोदर असल्याचं जाहीर केलं आहे. बेबी बम्पसह फोटो शेअर करत दियाने दिली गुड न्यूज दिली आहे.
15 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर दियाने वैभव रेखीसोबत लगीनगाठ बांधली. लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच दियाने बेबी बम्पसह फोटो शेअर करत दियाने गुड न्यूज दिली. त्यामुळे दिया लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याच्या चर्चेला उधाण आलं. यादरम्यान दियाच्या फोटोवर एका इन्स्टाग्राम युझरने थेट लग्नाआधीच प्रेग्नन्सी जाहीर का नाही केलीस?, असा सवाल विचारला. त्यावर उत्तर देताना दियाने लग्नाआधी गरोदर असल्याचं कबूल केलं आहे.
आम्हाला मूल होणार आहे, म्हणून आम्ही लग्न केलं नाही, असं दियाने म्हटलं आहे. आम्हाला आयुष्य एकत्र घालवायचं असल्यामुळे आम्ही लग्न करणार होतो. मात्र लग्नाची तयारी करत असताना आपल्याला बाळ होणार असल्याचं आम्हाला समजलं असल्याचं दियाने सांगितलं. आमचं लग्न मी प्रेग्नंट असल्यामुळे झालेलं नाही, असं दियाने स्पष्ट केलं आहे. तसेच वैद्यकीय कारणांमुळे सुरक्षिततेची हमी मिळेपर्यंत प्रेग्नंट असल्याचं सांगितलं नाही. माझ्या आयुष्यातील ही अत्यानंदाची गोष्ट असल्याचं दियाने म्हटलं आहे.
दियाने फेब्रुवारीमध्ये वैभव रेखीशी लग्न केले आणि आता ती पहिल्यांदाच आई होणार आहे. दिया सध्या मालदिवमध्ये तिचा हनीमून साजरा करतीये. दिया मिर्झाचे हे दुसरं लग्न आहे. तसेच पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर दियाने व्यावसायिक वैभव रेखीशी लग्न केलंय. वैभव रेखी मोठा बिझनेसमॅन व इनव्हेस्टर आहे.
थोडक्यात बातम्या-
शिवभोजन थाळीसंदर्भात छगन भुजबळ यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या!
वाढीव वीज बिल येऊ द्यायचं नसेल तर ‘हे’ करा- नितीन राऊत
डॉ. आंबेडकर जयंतीला अभिवादनाचे कार्यक्रम साधेपणाने करा- उद्धव ठाकरे
“अनिल देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर होते पण या आरोपांची सत्यता काय?”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.