‘महाराष्ट्रात हुकुमशाही चालणार नाही’; अजित पवारांचा गंभीर इशारा
मुंबई | काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादमध्ये जंगी सभा घेतली. या सभेत त्यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरुन सरकारला 4 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे अद्यापही राज्यात या मुद्द्यावरुन गदारोळ सुरुच आहे.
देशातील हिंदु बांधवांना विनंती आहे, मागचं पुढचं काय बघू नका, हे भोंगे उतरले गेलेच पाहिजेत, सगळ्या धार्मिक स्थळांवरचे. अभी नही तो कभी नाही, असं राज ठाकरे यांनी मनसैनिकांना म्हटलं आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाराष्ट्रात हुकुमशाही चालणार नाही, असा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात कोणी अल्टिमेटम द्यायचं, हे कायद्याचं राज्य आहे. इथे हुकुमशाही कोणाची चालणार नाही. मग तो कोणीही असो, असं स्पष्टच अजित पवारांनी सांगितलं आहे.
दरम्यान, राज ठाकरेंच्या इशाऱ्यावरुन आता सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या –
मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर अमृता फडणवीसांचा पलटवार, म्हणाल्या…
राज ठाकरेंवर कारवाई होणार?, गृहमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती
वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना इशारा जारी
‘राज ठाकरे चौरंगी चिरा’, शरद पवारांवरील टीकेनंतर सुरेखा पुणेकर कडाडल्या
मोठी बातमी! व्लादिमीर पुतिन ‘या’ गंभीर आजाराने त्रस्त, लवकरच शस्त्रक्रिया होणार?
Comments are closed.