बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सिद्धार्थ शुक्ला मृत्यू प्रकरणी सस्पेंस वाढला! झोपेआधी घेतलेल्या गोळ्यांनी केला घात?

मुंबई | लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे अकाली निधन झाल्याची बातमी समोर येताच संपूर्ण बाॅलिवूडवर शोकांतिका पसरली आहे. एवढंच काय तर त्याचं जाणं अनेकांच्या जिव्हारी लागलं आहे. अशातच सिद्धार्थबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली असून या माहितीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

सिद्धार्थला ह्रदय विकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यु झालं असल्याचं मुंबईतील कूपर रुग्णालयाने स्पष्ट केलं आहे. मात्र त्याचा मृत्यू उपचारापूर्वीच झाला असून त्याने झोपण्यापूर्वी काही औषधं घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीने लोकांसमोर अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहे.

सिद्धार्थने घेतलेल्या गोळ्यांनंतर तो झोपेतून उठलाच नाही. त्यामुळे सेवन केलेल्या औषधांमुळेच त्याचा मृत्यू झाला का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सिद्धार्थचे मृतदेह अजूनही कूपर रुग्णालयात आहे. तसेच लवकरच त्याचे शवविच्छेदन देखील करण्यात येणार आहे.

सिद्धार्थने अनेक सुपरहिट चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र सर्वात जास्त तो लोकांच्या पसंतीस आला ते म्हणजे ‘बिग बाॅस 13’ नंतर. सिद्धार्थ बिग बाॅस 13चा विजेता होता. या शो दरम्यान त्याची आणि अभेनेत्री शेहनाज गिलची जोडी लोकांच्या मोठ्या प्रमाणात पसंतीस आली होती.

थोडक्यात बातम्या-

‘आ देखे जरा किसमे कितना है दम’; मनसेचं किशोरी पेडणेकरांना खुलं आव्हान!

बाॅलिवूडला मोठा धक्का! ‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाचे अकाली निधन

राज्यातील आकडा चिंता वाढवणारा; आयसीएमआरचा महाराष्ट्राला गंभीर इशारा

ॲमिटी मुंबई विद्यापीठात ऑनलाईन शिक्षणाचं बिगुल वाजलं

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच भारतीय तालिबानी”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More