देश

“मोदीजी पाच ऑगस्टच्या अशुभ मुहुर्तावर राम मंदिराचं भूमिपूजन टाळा”

नवी दिल्ली | काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी टि्वटस करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अयोध्येतील राम मंदिर निर्माण भूमिपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे.

अशुभ मुहुर्तावर राम मंदिराचे भूमिपूजन करुन मोदीजी तुम्ही अजून किती लोकांना रुग्णालयात पाठवणार आहात? योगीजी आत तुम्हीच मोदींना समजावा, तुम्ही असताना सनातन धर्माच्या सर्व मर्यादा का तोडल्या जात आहेत? आणि तुमची अशी काय अडचण आहे, कि, तुम्ही हे सर्व होऊ देताय? असं दिग्विजय सिंह यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

भारताचे गृहमंत्री अमित शहा, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि उत्तर प्रदेश भाजप अध्यक्षांना कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचं दाखले त्यांनी टि्वटसमध्ये दिले आहेत.

माझी मोदीजींना विनंती आहे, त्यांनी पाच ऑगस्टचा अशुभ मुहुर्त टाळावा, शेकडो वर्षाच्या संघर्षानंतर राम मंदिर निर्माणाचा योग आला आहे, असं दिग्विजय यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्र-बिहार संघर्षादरम्यान पहिल्यांदाच मुंबई पोलिस आयुक्त मीडियासमोर, म्हणाले…

जगातील ‘ही’ मोठी कंपनी TikTok खरेदी करण्याच्या तयारीत!

“हिंदूंना धडा शिकवण्यासाठी…”,आपच्या निलंबित नगरसेवकाचा धक्कादायक खुलासा!

बिहार-महाराष्ट्र आमनेसामने, त्या प्रकरणावरून नितीश कुमार थेट ठाकरे सरकारशी बोलणार!

उद्या लॉन्च होतोय जबरदस्त फिचरसह रेडमीचा नवा फोन, किंमत असणार फक्त 10 हजाराच्या आसपास!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.