भुजबळ जेलबाहेर आले पाहिजेत; भाजप मंत्र्याचीच मागणी!

पुणे | राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ लढवय्ये आहेत. ते जेलबाहेर आले पाहिजेत, अशी मागणी भाजपचे नेते आणि समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केलीय. महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त समता परिषदेकडून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

छगन भुजबळ यांना ज्या कलमाआधारे जामीन मिळत नव्हता ते कलमच आता रद्द झालंय. त्यामुळे भुजबळ लवकरच जेलबाहेर येतील, 

त्यांच्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय. कारण भाजप आणि भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी भुजबळांच्या अटकेसाठी पाठपुरावा केला होता.