बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘दिलीप कुमार उत्कृष्ठ अभिनेते होते पण…’, नसीरुद्दीन शाह यांंचं मोठं वक्तव्य

मुंबई | लोकप्रिय जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीपकुमार यांच्या निधनानं बॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. अशातच नसीरुद्दीन शाह यांनीही दिलीप कुमार यांच्या जाण्यावर शोक व्यक्त केला.

अनेक कलाकारांप्रमाणेच नसीरुद्दीन शाहदेखील दिलीप कुमार यांचे चाहते आहेत. मात्र दिलीप कुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल नसीरुद्दीन यांचं मत फार वेगळं आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ मध्ये लिहिलेल्या लेखात नसीरुद्दीन शाह यांनी त्यांचं स्पष्टपणे मत मांडलं आहे. दिलीप कुमार यांनी एक दिग्गज कलाकार असूनही हिंदी सिनेमा किंवा नवोदितांना पुढे जाण्यासाठी खास योगदान दिलेलं नाही, असं नसीरुद्दीन यांनी या लेखात म्हंटलं आहे.

पुढे त्यांनी म्हटलं की, इतके महान अभिनेते असूनही दिलीप कुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीसाठी अभिनयाशिवाय काहीच केलं नाही. ते नेहमीच सामाजिक कार्यात पुढे राहिले. त्यांनी समाजातील अनेक घटकांना मदत केली.

दरम्यान, आपल्या अभिनयाच्या अनुभवाचा उपयोग इतर कलाकारांसाठी केला नाही. त्यांनी फक्त एका चित्रपटाची निर्मिती केली. त्यांनी कोणताही चित्रपट दिग्दर्शित केला नाही. नवीन कलाकारांसाठी कोणत्याही प्रकारची मदत देऊ केली नाही. नवीन कलाकारांसाठी असं काहीच केलं नाही जे पाहून इतरांनी दिलीप कुमार यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, असंही नसीरुद्दीन यांनी लिहिलं.

थोडक्यात बातम्या – 

“भाजप बहुजन चेहरे वापरतो अन् नंतर बाजूला करतो, फडणवीस खोटारडे मुख्यमंत्री होते”

अभिनेत्री हेमांगी कवीच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ पोस्टला प्रविण तरडेंचा पाठिंबा, म्हणाले…

‘कौरव कोण, पांडव कोण हे त्यांनीच ठरवावं’; ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याचा पंकजा मुंडेंना टोला

“कधी-कधी कार्यकर्त्यांचा आक्रोश होत असतो, पण पंकजा मुंडे असे काही करणार नाहीत”

शेतकरी आंदोलनाच्या तोडग्यासाठी पावसाळी अधिवेशनादरम्यान शेतकरी संघटनांचं मोठं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More