बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मराठीपेेक्षा हिंदी चित्रपटांना झुकतं माप देता, कुठं आहेत शाखरूख, सलमान?”

रत्नागिरी | राज्यात मुसळधार पावसामुळे गेल्या काही दिवसांमागे सातारा, सागंली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. दरड दुर्घटनेमध्ये अनेक नागरिकांनी आपला प्राण जीव गमावला होता. सरकारने मदत जाहीर केली आहे. त्यासोबतच मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांनीही मदत जाहीर केली होती.

दिपाली सय्यद चिपळूणमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, मराठी चित्रपटांपेक्षा आपण हिंदी चित्रपटांना झुकतं माप देतो. जेव्हा आपत्ती येते तेव्हा ते मदतीला येतात का?, कुठे आहेत सलमान आणि शाहरूख?, असा सवाल दिपाली सय्यद यांनी केला आहे. चिपळूणमध्ये त्यांनी वाशिष्टी नदीकाठच्या भागात पाहणी केली त्यावेळी त्या बोलत होत्या.

आपण जर मराठी चित्रपटसृष्टीला ताकद दिली तरच मराठी कलाकार पुढे येतील. मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नाही, मराठी चित्रपटांना पाठबळ देत नाही. त्यांनी मदत करण्यासाठी बाहेर पडावं अशी अपेक्षा असेल तर लोकांनीही पाठबळ द्यायला हवं, असंही दिपाली सय्यद म्हणाल्या.

दरम्यान, दिपाली सय्यद यांनी याआधी पुरग्रस्तांसाठी 10 कोटी रूपयांची मदत जाहीर केली होती. त्यावेळी त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

भारताला क्रिकेटमध्ये विश्वचषक जिंकून देणारा ‘हा’ खेळाडू करतोय रोजंदारीवर काम!

दिलासादायक! पुण्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल, वाचा आजची आकडेवारी!

पावसाचं पुन्हा कमबॅक! राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट

नीरज मराठाच, त्याच्या घरी मी जाऊन आलोय- खासदार संभाजीराजे

“400 कोटींच्या भूखंडासाठी रानडेचं स्थलांतर”, माजी विद्यार्थ्यांच्या आरोपांनी विद्यापीठात खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More