बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनासारखी संकटे पुढेही येऊ शकतील- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | भविष्यात कोरोनासारखी अनेक संकटे येऊ शकतील. त्यांच्याशी लढण्यासाठी आम्हाला पूर्ण तयारी करावी लागेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदेच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी

आता काळ बदलला आहे. आम्हाला कोणत्याही तंत्रज्ञानासाठी वर्षानुवर्षे वाट बघावी लागत नाही. आधी शोध जगात कोणत्या तरी देशात व्हायचे व त्या तंत्रज्ञानासाठी भारताला अनेक वर्षे वाट पाहावी लागायची, असं मोदी म्हणाले.

आज आमचे वैज्ञानिक त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आमच्या वैज्ञानिकांनी एका वर्षातच स्वदेशी कोरोना लस तयार केली, असं म्हणत नरेंद्र मोदींनी यावेळी वैज्ञानिकांचं तोंडभरून कौतुक केलं.

कोरोनाची मेड इन इंडिया लस तयार केल्याबद्दल आणि करोनाचा उद्रेक झाल्यानंतर त्याचा प्रतिकार करण्यासाठी केवळ एका वर्षातच अन्य उपाययोजनांना चालना दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शास्त्रज्ञांचं कौतुक केलं. तसेच भारताने कोव्हॅक्सिन लस विकसित केली, शास्त्रज्ञांनी करोना चाचणी किट तयार करून भारताला स्वयंपूर्ण बनविले, अल्पावधीत औषधे शोधून काढली, प्राणवायू निर्मितीला चालना दिली, असं मोदी म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

नोकरीची सुवर्णसंधी; कोकण रेल्वेमध्ये ‘या’ पदांसाठी भरती, असा करा अर्ज

भाजप मनसेला टाळी देणार का?; मनसे-भाजप युुतीबाबत फडणवीस म्हणाले…

अनलॉकचे पाच टप्पे निश्चित; सरकारकडून नियमावली जाहीर, वाचा एका क्लिकवर

फेसबुकचा डोनाल्ड ट्रम्प यांना झटका; केली ही मोठी कारवाई

…तोपर्यंत कुणी माईचा लाल हे सरकार पाडू शकत नाही- अजित पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More