बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाप लेकीच्या नात्याला काळीमा! लेकीनेच केली बापाची हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

नागपूर | नागपूरमधील हिंगणा येथे बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सावत्र लेकीने आपल्याच बापाची हत्या केल्याने संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याबाबतचा तपास केल्यानंतर अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. मृत झालेल्या व्यक्तीचं नाव ज्ञानेश्वर असं आहे.

पंधरा वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर यांच्या पहिल्या पत्नीनं सोडून दिल्यानंतर त्यांनी वंदना नावाच्या एका विवाहित महिलेशी लग्न केलं होतं. लग्नाच्या वेळी वंदनाला पहिल्या नवऱ्यापासून एक मुलगी होती. लग्न झाल्यानंतर ज्ञानेश्वर सावळी बीबी याठिकाणी वंदनासोबत राहू लागला. काही दिवस एकत्र राहिल्यानंतर ज्ञानेश्वर वर्धा जिल्ह्यातील खापरी याठिकाणी राहायला गेला. पण तो अधून मधून सावळी बीबी याठिकाणी वंदनाला भेटायला येत होता.

भेटायला आल्यानंतर तो वंदनाला आणि सावत्र मुलीला नेहमी त्रास द्यायचा. सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास मृत सावत्र वडील ज्ञानेश्वर नेहमी प्रमाणे दारू पिऊन आला. यावेळीही त्यानं 17 वर्षीय सावत्र मुलीवर बळजबरी करण्यास सुरुवात केली. यावेळी वंदना देखील तिथेच होत्या. पत्नीलादेखील आवरत नसल्याचं पाहून पीडित मुलीनं जवळचं पडलेल्या लाकडी दांड्यानं ज्ञानेश्वरच्या तोंडावर जबरी वार केला. या एका फटक्यात ज्ञानेश्वर बेशुद्ध पडला. यानंतर रक्तप्रवाह जास्त झाल्यानं ज्ञानेश्वर यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, मृत ज्ञानेश्वरला चार वर्ष तुरुंगवास झाला होता. त्यानं 2016 मध्ये त्याच्या अल्पवयीन सावत्र मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी न्यायालयानं त्याला कलम 376 आणि पोक्सो कायद्यांतर्गत 4 वर्षांची शिक्षा सुनावली होती.

थोडक्यात बातम्या-

नागपूरात एका अल्पवयीन मुलीने प्रियकराच्या मदतीने स्वतःच्याच आजीचा चिरला गळा अन्…

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माजी अध्यक्षांचं कोरोनानं निधन, लसीचे दोन्ही डोस घेतलेले!

‘केम छो वरळी विचारणारा आमदार कुठे आहे?’; निलेश राणे यांचा वरळीकरांना सवाल

देशातील कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट, पण मृतांचा आकडा चिंताजनक

कोरोना रुग्णांवर ‘म्युझिक थेरपी’, झिंगाट गाण्यावर कोरोना रूग्ण थिरकले ; पाहा व्हिडीओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More