मनोरंजन

‘हा’ बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे दिशा पटानी सोशल मीडियावर ट्रोल!

मुंबई | अभिनेत्री दिशा पटानीने कोणताही फोटो किंवा व्हीडिओ शेअर केला की त्यावर चाहत्यांच्या कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडत असतो. मात्र यावेळी तिने शेअर केलेल्या फोटोमुळे तिला नेटकऱ्यांची टीका सहन करावी लागली आहे.

दिशाने एक बोल्ड फोटो शेअर केला असून त्यावर अनेकांनी तिला खडेबोल सुनावले आहेत. दिशा Calvin Klein या ब्रॅण्डची अ‌ॅम्बेसिडर असून तिने काही दिवसापूर्वी या ब्रॅण्डसाठी एक फोटोशूट केलं. या फोटोशूटचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोमध्ये ती प्रचंड बोल्ड दिसत असल्यामुळे तिला नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे.

दिशा बाकी सगळं ठीक आहे,परंतु हा फोटो फार विचित्र आहे’ असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर दिशा मी तुझी फार मोठी चाहती आहे, पण अशा प्रकारचा फोटो? असं एका युजरने म्हटलं आहे.

दरम्यान, दिशाच्या या फोटोला लाखोंच्या संख्येने लाइक्स आले आहेत. हा फोटो काही नेटकऱ्यांना आवडला आहे. तर काहींनी मात्र प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

 

 

View this post on Instagram

 

🧨 🎆 🎇 #MYCALVINS #CK50 @calvinklein

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

महत्वाच्या बतम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या