बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…जेव्हा ‘द वाॅल’ म्हणतो, “तो माझ्यासाठी काही अभिमानाचा क्षण नव्हता”

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा ‘द वाॅल’ आणि माजी कर्णधार राहुल द्रविड लवकर भारतीय संघाचा प्रशिक्षण होणार असल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ पुर्ण होत असल्याने आता राहुल द्रविडच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत बीसीसीआय लवकरच निर्णय घेणार असल्यानं आता अंतिम निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच आता राहुल द्रविडने आपल्या मागिल कृतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

आयपीएल इतिहासातील सर्वात रोमांचक आणि श्वास रोखून ठेवणारा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान राॅयल्स यांच्यात झाला होता. या सामन्यात अजिंक्य तारेने षटकार खेचत मुंबई इंडियन्सला प्ले ऑफमध्ये पोहचवलं होतं. त्यावेळी राहुल द्रविडने संताप व्यक्त करत आपली टोपी जमिनीवर आदळली होती. त्यावर आता राहुल द्रविडने भाष्य केलं आहे.

जमिनीवर टोपी आदळण्याचा तो क्षण माझ्यासाठी काही अभिमानास्पद क्षण नव्हता, असं म्हणत राहुल द्रविडने नाराजी व्यक्त केली. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान राॅयल्स यांच्यातला हा अतीतटीचा सामना होता. सामना ड्राॅच्या स्थितीत पोहचल्यानंतर मुंबईला एक चेंडू सीमापार करायचा होता.

दरम्यान, फाॅक्नरने चुकीच्या ठिकाणी चेंडू टाकल्याने राहुल द्रविडचा संताप अनावर झाला आणि त्याने टोपी जमिनीवर आदळली होती. या घटनेवर द्रविडने भाष्य केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पुढील 48 तास धोधो पाऊस; ‘या’ 10 जिल्ह्यांना अलर्ट जारी

‘मलिकांना मिरच्या का झोंबल्यात?…’ नवाब मलिकांच्या आरोपावर फ्लेचर पटेलांचं प्रत्युत्तर

अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भुमिका निभावलेल्या ‘या’ अभिनेत्रीचं निधन

“वाटलं तर तुम्ही जो बायडन यांनाही प्रचाराला आणा, शिवसेना घाबरत नाही”

टीम इंडीयाचा नवीन कोच ठरला, ‘या’ खेळाडूने स्विकारली जबाबदारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More