बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट; 15 वर्षांचा संसार मोडला

मुंबई | अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांचा 15 वर्षांचा संसार संपुष्टात आला आहे. दोघांनी एकमेकांच्या समहमतीने घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं आहे. आमिर आणि किरण यांनी एक जॉइंट स्टेटमेंट जारी करत त्यांच्या घटस्फोटाविषयी माहिती दिली आहे.

15 वर्षात आम्ही एकत्र अनुभव, आनंद आणि हास्य शेअर केलं आहे आणि आमचं नातं केवळ विश्वास, सन्मान आणि प्रेमामुळं वृद्धिंगत झालं आहे. आम्हाला आयुष्यात नवीन अध्यायाची सुरुवात करायची आहे- आता नवरा बायको म्हणून नाही तर सह-पालक आणि एकमेकांचं कुटुंब म्हणून राहू, असं त्यांनी म्हटलंय.

या दोघांच्या घटस्फोटाची बातमीने मोठा धक्काच बसला आहे. आमिर-किरणचा 15 वर्षांचा संसार मोडल्याने चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. मात्र दोघेही आता पती पत्नीसारखे राहत नसलो तरी मैत्री कायम राहिल, असं आमिर खानने सांगितलं आहे. किरण रावसह आमिर खानचे दुसरे लग्न होतं. घटस्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे कारण समोर आलेलं नाही.

आम्ही आमचा मुलगा आझाद यासाठी एक समर्पित पालक आहोत ज्याचं पालन-पोषण आम्ही एकत्र करू. आम्ही चित्रपट, पानी फाउंडेशन आणि ज्याबद्दल आम्ही भावुक आहोत अशा प्रकल्पांसाठी सहकारी म्हणून काम करत राहू, असंही आमिर खान आणि किरण राव यांनी जॉइंट स्टेटमेंटमध्ये म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; महापौरांनी दिली ही महत्वाची माहिती

“भाजपमधून बाहेर पडा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत”

‘दोन्ही डोसमुळे मृत्यूचा धोका 98 टक्क्यांपर्यंत कमी, तर एक डोसमधून…’; केंद्र सरकारची माहिती

धक्कादायक! कल्याणमधील कोळसेवाडीत दोन तरुण आणि एका तरुणीला जमावाकडून बेदम मारहाण

…मग पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही ईडी चौकशी व्हावी – नाना पटोले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More