मुंबई | जेवढ्या चौकशा करायच्या त्या करा. आम्ही घाबरत नाही. आता चौकश्यांना तुम्ही घाबरा. महाराष्ट्रातही आमची सत्ता आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
मिडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “सध्या देशात दबाव तंत्राचं राजकारण सुरु आहे. त्यामुळेच ईडी मार्फत चौकशा लावल्या जात आहेत. ज्या प्रकरणाचा तपास केला जात आहे. त्याच्याशी सरनाईक कुटुंबाचा काहीही संबंध नाही”.
मराठी माणसाने उद्योग करणे हा केंद्रीय सरकारला गुन्हा वाटतो का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
तसेच व्यवसाय, उद्योग करणाऱ्या मराठी माणसावर चौकशा लावाल तर मराठी माणूस तुमच्या छाताडावर उभा राहिलं, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
अहमद पटेल यांच्या निधनाने महाविकास आघाडीने मार्गदर्शक गमावला- मुख्यमंत्री
कष्टकऱ्यांची भाऊबीज हा कष्टाला प्रतिष्ठा देणार उपक्रम -राधाकृष्ण विखे पाटील
अहमद पटेल यांच्या निधनाने अनुभवी, निष्ठावंत व समर्पित नेतृत्व गमावले- बाळासाहेब थोरात
फाशी दिली तरी स्विकारणार मात्र, ईडीच्या धाडीमुळे तोंड बंद करणार नाही- प्रताप सरनाईक
बेफिकर लोकांमुळे निर्बंध घालण्याचा सरकार विचार करेल- राजेश टोपे