बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बुस्टर डोसची गरज आहे का?, असेल तर कोणती लस घ्यावी?; तज्ज्ञ म्हणतात…

मुंबई | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. वेगाने पसरत असलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron Varient) अखेर भारतात शिरकाव झाला. त्यामुळे भीतीचं वातावरण पहायला मिळत आहे. लसीकरण मोहीम आता संपुर्ण देशभर राबवलं गेली असल्याने आता Omicronचा धोका कमी असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच आता भारतात बुस्टर डोसची (Booster dose) मागणी देखील होताना दिसत आहे.

Omicronचा धोका पाहता आता जगातील अनेक देशांनी Booster dose देण्यास सुरूवात केली आहे. अमेरिकेत देखील बुस्टर डोसला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतात देखील Booster dose मागणी होताना दिसतीये. अशातच सध्या Booster doseची गरज नसल्याचं लॅन्सेट या मेडिकल जर्नलमधून सांगण्यात आलं आहे. लॅन्सेट या जर्नलमध्ये अनेक तज्ज्ञांनी यावर लिखान केलं आहे.

कोरोनाचा जर एखादा नवीन धोकादायक व्हेरिएंट आला तर त्यावेळी Booster dose द्यावा, असं देखील तज्ज्ञांनी म्हटलं आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदिप गुलेरिया यांनी याबाबत सल्ला दिला आहे. जेव्हा कधी तुम्ही बूस्टर डोस घ्याल, तेव्हा तो वेगळ्या कंपनीच्या लशीचा घ्यावा, असं डाॅ. गुलेरिया म्हणतात.

दरम्यान, जर एखाद्याने कोव्हॅक्सिन लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर Booster dose हा कोविशिल्डचा घ्यावा आणि जर दोन्ही जोस हे कोविशिल्डचे (Covishield) घेतले असतील तर Booster dose हा कोव्हॅक्सिनचा घ्यावा, असं डॉ. रणदिप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) म्हटले आहेत. एका वृत्तवाहिनीवर त्यांनी ही माहिती दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘मिस यु आई’ म्हणत एअरपोर्टवर गेला अन् आईनी चपलेने धुतलं; पाहा मजेशीर व्हिडीओ

“अनिल परबांची तेवढी ताकद नाही, मंत्री म्हणून जी संविधानिक उंची लागते ती…”

“तेव्हा मला माझीच लाज वाटली, कोणीतरी कानाखाली मारल्यासारखं वाटलं”

Omicron मुळे तिसरी लाट येणार?, आली ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

चक्रीवादळाचा धोका! ‘या’ तीन राज्यांना अलर्ट जारी, रेल्वे गाड्या देखील रद्द

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More