बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डॉक्टरांनी जिवंत बाळाला केलं मृत घोषित; अंत्यसंस्कारावेळी जे घडलं त्याने सर्वांनाच बसला धक्का

रांची | झारखंडमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका खासगी क्लिनिकने प्रसूतीनंतर जिवंत नवजात बाळाला मृत घोषित केल्याचं समोर आलं आहे. झारखंडच्या देवघरमधील काली मंडा रोडवरील एका खासगी रुग्णालयात ही घटना घडली आहे.

नवजात बाळाला चांगल्या उपचारासाठी देवघर इथे घेऊन जाण्यात आलं आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र संबंधित रुग्णालयाच्या संचालकांनी हे सर्व खोटं असल्याचा दावा केला आहे.

डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केल्यानंतर कुटुंबीय त्याला घेऊन घरी गेले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. मात्र, अंत्यसंस्कारावेळीच नवजात बाळ अचानक रडू लागलं. यानंतर सर्वांनाच धक्का बसला. यानंतर वैतागलेल्या नातेवाईकांनी क्लिनिकची तोडफोड करत आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण केली.

क्लिनिकमध्ये तिच्या सुनेची प्रसूती केली गेली. जेव्हा बाळाचा जन्म झाला तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की हे बाळ जिवंत नसून त्याचा मृत्यू झाला आहे, असं नवजात बाळाची आजी रेखा देवी यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

मुंबईत पावसाचा हाहाकार; विक्रोळीत सहा घरांवर दरड कोसळली, तिघांचा मृत्यू

“दानिश सिद्दिकी यांच्या मृत्यूचा आनंद साजरा करणाऱ्या प्रत्येकाचा नाश होईल”

“अभिनय करून पोटापाण्याचं पहा, फार डोकं चालवू नका”

“योगींनी लोकसंख्या नियंत्रण कायदा लावलाच तर UP भाजपचे 160 आमदार बाद होतील”

अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांच्या लसीकरणबाबत सरकारने उचललं मोठं पाऊल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More