बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कुणाच्या भडकवण्याला बळी पडू नका, सरकार तुमच्यासोबत आहे- उद्धव ठाकरे

मुंबई | जो मार्ग सर्वोच्च न्यायालयाने दाखवला आहे या निर्णयातून केंद्र सरकारचा अधिकार दाखवला आहे. आम्ही सर्व पक्ष एकत्र आहोत. ही न्याय हक्काची मागणी आहे. या मागणीचा अपमान केंद्र सरकार आणि राष्ट्रपती करणार नाहीत, अशी खात्री आहे. कुणाच्या भडकवण्याला बळी पडू नका. महारष्ट्र सरकार तुमच्या सोबत आहे. तुम्हाला न्याय मिळेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर भाष्य केलं.

काही दिवसांपूर्वी सर्व पक्षांनी एकमुखी एकमताने मराठा आरक्षणाला आरक्षण देण्याचा कायदा केला. उच्च न्यायालयात लढाई जिंकली आणि त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान मिळालं. नेमक्या या कोरोनाच्या लढ्यातच हा निराशाजनक निकाल आला. सर्वांनी एकमुखाने घेतलेल्या या आरक्षणाविरोधात निकाल दिला. काहीजण सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली नसल्याचा आरोप करतात. मात्र, हे खंर नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

सर्वोच्च न्यायालयाने न्याय कुठे मिळेल हे सांगितलंय. त्यामुळे मी पंतप्रधान मोदींना हात जोडून विनंती करतो की मोदींनी हिंमत आणि संवेदनशीलता मराठा आरक्षणात दाखवावी, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

मी पंतप्रधान मोदींना हात जोडून विनंती करतो की…- उद्धव ठाकरे

दिलासादायक! पुण्यात आज कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त

कडक सॅल्यूट! पंक्चर काढणाऱ्या 60 वर्षीय नागरिकाने दिले 90 ऑक्सिजन सिलेंडर

हृदयद्रावक घटना, एकुलत्या एक मुलाचा कोरोनानं मृत्यू झाल्याचं कळताच आईनेही सोडले प्राण

“मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही केंद्राची इच्छा आहे का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More