बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोना लसीचा दुसरा डोस घ्यायचा विसरला असला तर…’, आरोग्य तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली | कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणावर भर दिला आहे. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेण्याचं आवाहन नागरिकांना केलं जात आहे. अशातच आता आरोग्य तज्ज्ञांनं कोरोनाच्या दुसऱ्या डोसविषयी महत्वाची माहिती दिली आहे.

कोरोनाची पहिली लस घेतल्यानंतर दुसरा डोस घेणं अनिवार्य आहे. मात्र काहींचा दुसरा डोस विसरुन घ्यायचा राहिला असेल तर त्यांनी काही चिंता करण्याची गरज नाही. लशीचा दुसरा डोस एक तर वेळेवर मिळालेला नाही किंवा ते दुसरा डोस घ्यायचं विसरून तरी आता घाबरुन जायचं कारण नाही. याविषयी तज्ज्ञांनी महत्वाची माहिती दिली आहे.

आरोग्य तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, कोरोनापासून सुरक्षितता हवी असेल, तर लशीचा दुसरा डोस घेणंही अत्यावश्यक आहे. कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी मेसेजद्वारे सूचना दिली जाते. ज्या व्यक्तींनी दुसरा डोस घेतला नसेल, त्यांना हा मेसेज वारंवार पाठवला जातो. जोपर्यंत लशीचा दुसरा डोस घेतला जात नाही, तोपर्यंत हा मेसेज पाठवला जातो.

दरम्यान, पुढे तज्ज्ञांनी म्हटलं की, लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर 40 टक्के अॅंटीबॉडीज तयार झाल्या असतील, तर उर्वरित 60 टक्के अॅंटीबॉडीज तयार होण्यासाठी कोरोनाप्रतिबंधक लशीचा दुसरा डोस घेणं आवश्यक आहे. त्यामुळे आपलं शरीर कोरोना विषाणूशी लढा देऊ शकेल.

थोडक्यात बातम्या – 

हृदयस्पर्शी! तहानलेल्या कुत्र्याला त्याने ओंजळीने पाणी पाजलं, पाहा व्हिडीओ

‘लोणीचोरी ही कृष्णलीला असेल तर मिठाईचोरी हा गुन्हा कसा?’; न्यायाधिशांचा निकाल चर्चेत

“चंद्रकांत पाटील यांची वेगळीच तऱ्हाय, एकंदरीत सगळीच गंमतय”

एलआयसीच्या ‘या’ स्कीममध्ये एकदाच पैसे भरा अन् महिन्याला मिळवा ‘इतक्या’ हजारांची पेन्शन

काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यामध्ये तुफान हाणामारी; भाजप खासदाराला कपडे फाटेपर्यंत मारलं, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More