बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘डिवचू नका नाहीतर सोडणार नाही’; शिवसेनेचा राष्ट्रवादीला थेट इशारा

पुणे | शिवसेना खासदार संजय राऊत सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. शिरुर आणि खेड तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, इथे आता राष्ट्रवादीची सत्ता आहे. राज्यात जरी महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी शिरुर आणि खेडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षामध्ये वाद सुरू असतात. त्यातच आता सेना विरूद्ध राष्ट्रवादी असा वाद समोर आल्याचं पहायला मिळतंय.

संजय राऊत आणि मिलींद नार्वेकर राष्ट्रवादीच्या नेत्यांना इशाऱ्यावर इशारे देताना दिसतात. शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर यांनी शिरुरचे आमदार अशोक पवार यांना डिवचू नका नाहीतर सोडणार नाही, असा इशारा दिला आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात शिवाजीराव आढळराव पाटलांनी विजयाची हॅट्रिक केली होती. मात्र, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांना चौकार मारण्यापासून रोखलं होतं

आता शिवसेनेने या ठिकाणी पुन्हा विजयी होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शिरुरसारखीच परिस्थिती खेडमध्ये देखील पहायला मिळत आहे. आम्ही शरद पवारांचा आदर करतो, ते महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक आहेत. परंतु, खेडमध्ये जे किडे वळवळ करत आहेत त्यांचा आम्ही बंदोबस्त करू, असा इशारा राऊतांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना दिला होता.

संजय राऊत यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी पुढील निवडणुकांमध्ये विजय मिळवण्याचा मानस असल्याचं सांगितलं. शिरुर आणि जुन्नरमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवणार, असा निर्धार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण; भारतीय संघातील ‘हे’ तीन जण विलगीकरणात

आंदोलन करायचं असेल तर कोरोना विरोधात करा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“तो देश लुटायलाच आलाय, मी त्यांच्याबद्दल नाही, तर मनी हाईस्ट बद्दल बोलतीये”

पंजशीर खोऱ्यात रक्तपात, 600 तालिबानी यमसदनी, दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं!

“शरद पवारांनी खंजीर खूपसल्याचं एक उदाहरण दाखवा, मी राजकारण सोडतो”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More