बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ देशात तब्बल 900 लोकांना एक्सपायर झालेल्या कोरोना लसीचे डोस

नवी दिल्ली | अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये तब्बल 899 लोकांना एक्सपायर झालेल्या फायझर लसीचे डोस देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. न्यूयॉर्क शहर आरोग्य विभागाने यासंदर्भात मंगळवारी माहिती दिली आहे. तसेच कंत्राटदार कंपनीने नागरिकांची पत्रकाद्वारे माफी मागितली आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार न्यूयॉर्क शहरातील ईटीसी लसीकरण सर्विसेस या कंपनीला लसीकरणाचं कंत्राट देण्यात आलं आहे. या कंपनीने तब्बल 899 लोकांना एक्सपायर झालेल्या फायझर लसीचे डोस दिले आहेत. यासंदर्भात कंपनीने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार ज्यांनी हे डोस घेतले आहेत, त्यांच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

अमेरिकेत सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या आहे. तसेच आतापर्यंत 03 कोटी 43 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. अमेरिकेसारख्या प्रगल्भ आणि पुढारलेल्या राष्ट्राकडून एवढी गंभीर चूक झाल्याने या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

5 ते 10 जून दरम्यान टाइम्स स्क्वेअरमधील एनएफएल एक्सपीरियंस बिल्डिंगमध्ये 899 लस घेतलेल्या लोकांनी तात्काळ आणखी एक लसीचा डोस घेण्याची गरज असल्याचं अमेरिकेतील आरोग्य विभागाने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात

काळी, पांढरी आणि पिवळ्या बुरशीनंतर आता देशात हिरव्या बुरशीचा पहिला रूग्ण

भारताची कोरोनामुक्तीकडे आगेकुच; कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट

‘दोन डोसमधील अंतर वाढवण्याची शिफारस केलीच नव्हती’; ‘या’ शास्त्रज्ञांचा खळबळजनक दावा

कोट्यवधींच्या साखरेचं पावसाने मोठं नुकसान; तब्बल 30 हजार पोते भिजले

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More