बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यांना ‘इतक्या’ कोटी लसींचे डोस दिले; केंद्र सरकारने जाहीर केली आकडेवारी

नवी दिल्ली | सध्या सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. अशातच डेल्टा व्हेरिएंट विषाणू पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कोरोना नियंत्रीत करण्यासाठी सध्या लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडविया यांनी लसीकरणावर भर देण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यातच राज्यांना देण्यात आलेल्या लसींचा आकडा आरोग्य विभागाने जाहीर केला आहे.

केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारने आतापर्यंत केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना 43 कोटी 79 लाख 78 हजार 900 लसी वितरीत करण्यात आल्या आहेत, त्यापैकी 40 कोटी 59 लाख 77 हजार 410 लसींचा वापर झाला आहे. याची स्वतंत्र आकडेवारी देखील केंद्राने जाहीर केली आहे. तर 3 कोटी 20 लाख 01 हजार 490 लसींचे डोस शिल्लक आहेत. तर गेल्या 24 तासात 22 लाख 77 हजार 679 लसीचे डोस देण्यात आले आहेत.

लसीकरण मोहिमेला तरूणांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आतापर्यंत 53 लाख 22 हजार 634 तरूणांनी लसीचा दुसरा डोस देखील घेतला आहे. काही महिन्यांपुर्वी कोरोना लसीच्या वाटपावरून आता केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात वाद झालेला दिसत होता. आता केंद्र सरकारकडून राज्यांना लस पुरवण्यात येत आहे. मात्र लोकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे आता लसीचा तुटवडा पुन्हा जाणवू लागला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी केंद्र सरकार पुरेश्या प्रमाणात लस देत नसल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान, गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे नवे 41,383 रूग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासात 38,652 रूग्ण बरे झाले आहेत. तर गेल्या 24 तासात देशात 507 रूग्णांचा मृत्यु झाला आहे. तर देशात एकूण कोरोना बाधिकांची अॅक्टिव रूग्णसंख्या 4,09,394 वर पोहचली आहे. तर सध्या देशाचा रिकव्हरी रेट 97.35 % इतका आहे.

थोडक्यात बातम्या-

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठा झटका; सरकार ‘हा’ निर्णय घेण्याच्या तयारीत

जातीचा उल्लेख केल्यानं ‘मिस्टर आयपीएल’ वादाच्या भोवऱ्यात!

राज कुंद्रा प्रकरणातील एका नावामुळे मोठा गोंधळ, ‘या’ मराठी अभिनेत्याला झाला मनस्ताप

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी निर्बंध शिथिल करणार- राजेश टोपे

‘तो कंटेट वल्गर होता, पण…’; राज कुंद्राच्या वकीलांचं स्टेटमेंट समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More