Top News औरंगाबाद महाराष्ट्र

आईविरोधात वडिलांचं पॅनल उभं करणाऱ्या पिशोरी ग्रामपंचायतीचा पाहा काय लागला निकाल!

औरंगाबाद | औरंगाबादमधील एका ग्रामपंचायत निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. आईविरोधात मुलानं वडिलांचं पॅनल उभं केल्यानं निवडणुकीचा निकाल काय लागणार याबाबत सर्वांना उत्सुकता होती. या पिशोरी ग्रामपंचायतीचा निकाल लागला आहे.

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव आणि जावई हर्षवर्धन जाधव यांनी एकमेकांविरोधात निवडणुक लढवली होती. मात्र पिशोरी ग्रामस्थांनी संजना जाधव आणि हर्षवर्धन जाधव यांना नाकारलं असून दोघांचाही पराभव झाला आहे.

हर्षवर्धन जाधव यांना 17 पैकी 4 जागा जिंकता आल्या. तर संजना जाधव यांना फक्त 2 जागा मिळाल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडीनं 9 जागांवर विजय मिळवला तर उर्वरित जागा अपक्षांना मिळाल्या आहेत.

दरम्यान, पुण्यात एका दाम्पत्याला मारहाण प्रकरणी हर्षवर्धन जाधवांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अकरावीत शिकत असलेल्या त्यांचा मुलगा आदित्य जाधव याने वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली होती.

थोडक्यात बातम्या-

पाटोद्यात पेरे पाटील हरले, हिवऱ्यात पोपटराव जिंकले; अण्णांच्या राळेगणमध्ये काय झालं?

कोरोनामुळं बायकोचं चुंबनही घेतलं नाही, मग…- फारूक अब्दुला

“राज्यातील सहा हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये कमळ फुलणार”

नविन पॉलिसी मान्य नसेल, तर व्हॉट्सअॅप डिलीट करा- दिल्ली उच्च न्यायालय

आरोपांनंतरही धनंजय मुंडेंचा परळीत विजयी षटकार

…म्हणून कोकणात शिवसेनेची ताकद होती- नारायण राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या