बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पतीला दुहेरी जन्मठेप, पत्नीची हत्या कशी केली वाचाल तर काळजाचा थरकाप उडेल!

तिरूअनंतपुरम | गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. अशातच आता घरात कोब्रा सोडून पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार केरळमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. दोन वर्षापूर्वी ज्याप्रमाणे एका व्यक्तीने आपल्या पत्नीला मारण्याचा प्रयत्न केला होता, तसाच काहीसा प्रकार दोन वर्षानंतर घडल्याने केरळमध्ये खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

केरळमध्ये राहणाऱ्या सुरज आणि उत्तराचा दोन वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला. सासरकडून लग्नावेळी सुरजला 10 लाख रूपये रोख रक्कम, मालमत्ता नविन कार आणि काही सोनं देण्यात आलं होतं. परंतु लग्नानंतर दोन वर्षांनी आणखी हुंडा मागितला. त्यामुळे उत्तराने तिचं सासर सोडलं होतं. त्यानंतर तिच्या पतीने उत्तराला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याने पत्नीला झोपेच्या गोळ्या देऊन तिच्यावर साप सोडला होता. मात्र, उत्तरा यातून बचावली.

उत्तराने पतीला सोडल्यानंतर ती आपल्या मामाकडे रहायला आली. मात्र, त्यानंतर दोन वर्षींनी पुन्हा तोच प्रकार घडला. काही दिवसांपूर्वी उत्तरा झोपेत असताना तिला कोब्रा साप चावला आणि झोपेतच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या माहेरच्यांनी तिच्या पतीवर गंभीर आरोप केले आणि पोलिसात तक्रार दाखल केली. पती मनोजने मुद्दाम उत्तराच्या अंगावर साप सोडल्याचा आरोप उत्तराच्या माहेरच्यांनी केला आहे.

दरम्यान, पत्नीची हत्या केल्याप्रकरणी आरोपी सुरजला कोल्लमच्या सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हुंड्याकरीता पत्नी उत्तराची हत्या आणि छळ केल्याप्रकरणी सुरज दोषी आढळला आहे. यावरुन कोल्लमच्या सत्र न्यायालयाने जन्मठेपेपूर्वी प्रत्येक आरोपाखाली सतत 10 वर्षे आणि 7 वर्षे शिक्षा ठोठावली आहे. याबरोबरच दोषी सुरजला पाच लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

सचिनच्या लेकीचा फोटो, अभिनेत्याचा एक लाईक अन् नव्या चर्चांना उधाण

“ज्यांची बुद्धी कमी असते, त्यांना माझं वक्तव्य समजलं नाही”

काजू-बदाम कशाला??? फक्त शेंगदाणे खा… होतील फायदेच फायदे

अखेर बळीराजाला मदत! ठाकरे सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“ती ऑफर न स्वीकारायला शरद पवार काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More