बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्यांच्या निधनाने मला…’; सिंधुताईंच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना

नवी दिल्ली | अनाथांची माय अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) याचं मंगळवारी निधन झालं आहे. हद्यविकाराच्या झटक्याने मंगळवारी रात्री 8 वाजता त्यांचं निधन झालं. सिंधुताई यांच्या अशा अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Narendra Modi) ट्विट करत सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.

“सिंधुताई यांनी केलेल्या समाजसेवेसाठी त्या नेहमी स्मरणात राहतील. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक अनाथ मुले चांगल्या दर्जाचे आयुष्य जगू शकली. त्यांनी उपेक्षित समुदांयामध्येही खूप काम केलं आहे,” अशा भावना व्यक्त करत पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधुताई सपकाळ यांना श्रद्दांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटमध्ये सिंधुताईंच्या निधनाने मला अतिशय दु:ख झाल्याचंही म्हटलं आहे. याशिवाय पुढे त्यांच्या कुटूंबियांना आणि चाहत्यांना माझ्याकडू संवेदना, ओम शांती, असंही ते ट्विटमध्ये म्हटले आहेत. सिंधुताई यांच्यावर आज पुणे येथे शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दरम्यान, सिंधुताई यांनी अनेक अनाथ मुलांना आधार दिला आहे. सिंधुताई यांनी बाल निकेतन, सावित्रीबाई फुले मुलींचे वसतीगृह, अभिमान बाल भवन, गोपिका गाईरक्षण केंद्र, ममता बाल सदन, सप्तसिंधू महिला आधार, बालसंगोपन शिक्षण संस्था अशा अनेक संस्था सुरु केल्या आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

Corona: उद्यापासून पुणे शहरात ‘या’ निर्बंधांचं करावं लागणार पालन

धक्कादायक! पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद

मोठी बातमी! पुण्यातील 1 ली ते 8 वीच्या शाळा बंद

धक्कादायक! राज्यात तब्बल दोन डझन नेत्यांना कोरोनाची लागण, ‘या’ नेत्यांचा समावेश

“आपको हमारे जैसे हजारो मिलेंगे, पर…”; स्टोरी ठेवत तरुणानं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More