बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दुबईही झाली मालामाल! भारत-पाक सामन्यासाठी तब्बल ‘इतका’ तिकीट दर

मुंबई | भारताचा पाकिस्तानविरुद्ध टी-20 विश्चषक स्पर्धेमधील पहिला सामना आज दुबईमध्ये होत आहे. भारत-पाक सामना मैदानावर बघण्यासाठी क्रिकेट प्रेमींची आतुरता लागून आहे. त्यामुळे हा सामना बघण्यासाठी क्रिकेट प्रेमींकडून मोठ्या प्रमाणात तिकीट खरेदी केली जात आहे. भारत पाकिस्तान सामन्याच्या तिकीटाची किंमतही खुप महाग आहे. तसेच दुबईमधील हॉटेल, रेस्टॉंरंट्स अगोदर बुकिंग झालं आहे.

भारत पाकचा क्रिकेट सामना बघण्यासाठी जगभरातील चाहते दुबईमध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे दुबईमधील हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामाबरोबर 500 पॅकेजेस सामन्याच्या तिकीटांसह ऑफर देण्यात आली. एका पॅकेजची किंमत 40,700 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर काही हॉटेल मालक क्रिकेट चाहत्यांना नव-नवीन ऑफर देत आहेत.

भारत-पाक सामना मैदानावर बघण्यासाठीही मोठ्या प्रमाणात तिकीट विक्री झाली आहे. जी मागील तिकीट विक्रीपेक्षा 333 पट महाग झाली आहेत. पहिल्या रांगेसाठी 54,100 रूपये तर दुसऱ्या रांगेसाठी 31,200 रूपये तिकीट दर ठेवण्यात आला आहे. सर्वात कमी 12,500 रूपयांचं तिकीट असून, काही काही तिकीटांची किंमत ही 2 लाखांपर्यंत गेली आहे.

दरम्यान, टिव्हीवरही सामन्याच्या वेळी दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातींचा दर मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. 10 सेकंदाच्या जाहिरातीसाठी तब्बल 25 ते 30 लाखांपर्यंत स्लॉट विकला गेला आहे.  दैनिक भास्करने दिलेल्या माहितीनूसार आतापर्यंत इतक्या महागड्या जाहीराती कधी झाल्या नव्हत्या.

थोडक्यात बातम्या-

माही ‘हा’ सामना नको जिंकू म्हणणाऱ्या पाकिस्तानच्या तरूणीला धोनीचं भन्नाट उत्तर, पाहा व्हिडीओ

कांदा व्यापाऱ्यांकडे सापडलं 100 कोटींचं घबाड; नोटा मोजायला लागला ‘इतका’ वेळ

आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा मोठा गोंधळ, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्याच नाही

‘या’ रेल्वे स्थानकावर 55 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, प्रशासनाची झोप उडाली

…तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More