बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुळे यंदाही गणेशोत्सव साधेपणानंच; भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची होणार सोय

पुणे | कोरोना विषाणूनं गेल्यावर्षीपासून संपूर्ण जगात धुमाकूळ घातला. त्यामुळे गतवर्षीपासून सण-उत्सव आपल्याला शांततेत घरीबसूनच साजरा करावा लागला. यामध्ये गणेशोत्सवही साधेपणानंच साजरा करण्यात आला होता. सध्या कोरोनाची लाट ओसरत असल्यानं यावर्षीतरी आपण गणेशोत्सव साजरा करु, अशी आशा होती. मात्र तिसऱ्या लोटेचं सावट डोक्यावर असल्यामुळं यंदाही गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका असल्यानं यंदाही गणेशोत्सव साजरा करताना आवश्यक ती काळजी घेतली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करुन द्यावी, असं आवाहन शहर पोलीस दलाच्या वतीनं करण्यात आलं आहे. त्यामुळे यावर्षीही कोरोनाचा अंदाज घेता गणेशोत्सवाची नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

मानाच्या गणपतीच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोना माहामारीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या नियमावलींचं पालन करत यंदाही पोलिसांना संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं आश्वासन दिलंय. गणेशोत्सव साजरा करण्याबाबत झालेल्या बैठकीत पोलीस आणि गणेश मंडळ यांनी गतवर्षीप्रमाणं आचारसंहिता तयार करावी, असं ठरवण्यात आलंय.

दरम्यान, कोरोनामुळे गणेशोत्सव साधेपणानं साजरा होत असल्यानं गणेशभक्त नारज झाले आहेत. मात्र भाविकांना यंदाही ऑनलाईन दर्शनाची सोय करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त गर्दी न करता, कोरोना नियमाचं पालन करत, शांततेत गणेशोत्सव साजरा करावा, असं सरकाककडून वारंवार सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या –

संभाजीराजेंना बोलू न दिल्यानं संजय राऊत भडकले, पाहा व्हिडीओ

“मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय की नाही ते सांगा”

हिमाचल प्रदेशातील नॅशनल हायवेवर दरड कोसळली; धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल

‘…तर निवृत्तीनंतर दोन कोटी मिळतील’; जाणून घ्या ‘या’ योजनेबद्दल

अनाथ मुलांसाठी राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More