नागपूर | मुंबई, पुणे, नागपुरसह विदर्भातदेखील काही शहरांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबई पाठोपाठ आता नागपूर महानगरपालिकेनेही कोविड-19च्या निर्बंधांची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. हॉटेल्स केवळ 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार असून, 5 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळलेल्या बिल्डिंग सील केल्या जाणार आहेत.
कोरोनाबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असं म्हटलं आहे, की आता होम क्वारंटाइन रुग्णांच्या हातावर शिक्का मारण्यास पुन्हा सुरुवात होणार असून, अंत्यसंस्कार विधीला 20 पेक्षा अधिक व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही. गुरुवारी नागपुरात कोरोनाचे 644 नवे रुग्ण आढळले असून नागपुरात आतापर्यंत सापडलेल्या कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 41 हजारपर्यंत पोहचली आहे.
नागपुरात सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून 250 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आलं आहे. 75 दिवसांनंतर महाराष्ट्रात गुरुवारी एकाच दिवसात पाच हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यापैकी बहुतांश रुग्ण अकोला आणि नागपुर विभागातले असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
दरम्यान, यवतमाळ जिल्हा प्रशासनाने गुरुवारी रात्रीपासून 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केलं आहे. अमरावती जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवारी रात्री आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंतच्या काळात अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय पण प्रसिद्ध डॉ. तात्याराव लहानेंनी दिली दिलासादायक माहिती
कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवणारच; राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या जीआरवर दरेकर यांची टीका
मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोलेंना कोरोनाची लागण
ही वेळ एकमेकांना मदत करण्याची आहे, कुणी गैरफायदा घेत असेल तर खपवून घेणार नाही- एकनाथ शिंद
अखेर ठरलं! ‘या’ देशात होणार आयपीएलचा 13वा सीजन