बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ राज्यात लॉकडाऊनच्या सकारात्मक प्रभावामुळे सरकारने आणखी लॉकडाऊन वाढवला

नवी दिल्ली | देशभरात कोरोनामुळे अक्षरश: उद्रेक होत असताना पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येऊन आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचं भयावह चित्र पाहायला मिळत आहे.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी लॉकडाऊन घोषित केला होता. परंतु लॉकडाऊन केल्यानंतरही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने लॉकडाऊनला मुदतवाढ देण्याचा निर्णय पिनरायी विजयन यांनी घेतला आहे.

केरळमध्ये लॉकडाऊन 16 मे पर्यंत होता. लॉकडाऊनचा सकारात्मक प्रभाव पाहता केरळमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउनचा अवधी वाढवण्यात आला आहे. केरळमध्ये आता लॉकडाउन 23 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राज्यातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिरुवनंतपुरम, एर्नाकुलम, त्रिशूर आमि मलाप्पुरममध्ये ट्रिपल लॉकडाउन लावला जाणार आहे. या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

दरम्यान, केरळमध्ये गेल्या 24 तासात 35,696 करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका दिवसात 93 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 16 लाख 37 हजार लोकांनी करोनावर मात केली आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

“खिजगणतीत नसलेल्या पृथ्वीराज चव्हाणांना मोदी नॉन परफॉर्मिंग असेट वाटणं स्वाभाविक”

खरं का काय! कोंबडा बोलू लागला अल्लाह ,अल्लाह; पाहा तुफान व्हायरल व्हिडीओ

दिलासादायक बातमी! पुण्यात आज नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त!

ओव्हर एक्टिंगचे 50 कट! लस घेताना केलेल्या ड्रामामुळे मराठी अभिनेत्री झाली ट्रोल

सकारात्मक बातमी | कॅन्सरग्रस्त 3 वर्षाच्या चिमुकल्याची कोरोनावर मात, रुग्णालयात जल्लोष, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More